About Rayat Bank
आधुनिक महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान देणारी व गोरगरीब, दीन दुबळ्या जनतेच्या उद्धारासाठी व शैक्षणिक विकासासाठी रयत शिक्षण संस्थेचे व आपल्या बँकेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ ती. अण्णा यांनी दि.०४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेतील सेवकांच्या आर्थिक अडचणींचे निवारण करणेसाठी कर्मवीर अण्णांनी दिनांक १६ ऑगस्ट १९४० रोजी दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीचे दिनांक २१/१०/१९६९ रोजी बँकेत रूपांतर झाले. दिनांक १२/०९/१९८६ रोजी बँकेस रिझर्व्ह बँकेचे लायसन्स मिळाले आहे. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे.




























